Advertisement
BREAKING
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे”लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये नेत्रोपचारासाठी आलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस; राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही जाणून घेतली

“शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे”

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये नेत्रोपचारासाठी आलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस; राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही जाणून घेतली
पनवेल प्रतिनिधी: तुपगाव येथे ‘एक हात मदतीचा सामाजिक संस्था, तुपगाव’ यांच्या पुढाकाराने तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल व रोटरी क्लब, पनवेल यांच्या सहकार्याने आयोजित मोफत डोळे तपासणी व आरोग्य शिबिरात ज्या नागरिकांना पुढील उपचार व डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता, ते रुग्ण उपचारासाठी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल येथे दाखल झाले.
यावेळी भाजप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी स्वतः ट्रस्टमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेतली. प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत उपचाराबाबत माहिती घेतली. शिबिरात सांगितल्याप्रमाणे रुग्णांची आवश्यक तपासणी व आजाराचे निदान करण्यात येत असल्याची खात्रीही त्यांनी केली. तसेच रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

*कोट*
“शिबिर घेऊन आपली जबाबदारी संपत नाही. तपासणीसाठी आलेल्या गरजू व्यक्तीला आवश्यक उपचार मिळून तो समाधानाने घरी परतेपर्यंत त्याच्या सोबत राहणे हीच खरी सेवा आहे. आपल्या माणसांना योग्य उपचार मिळावेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसावे, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही,” अशी भावना श्री. प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केली.

या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या श्री.सचिन साळवी यांच्या ‘एक हात मदतीचा सामाजिक संस्था, तुपगाव’, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल, रोटरी क्लब, पनवेल, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
Previous Post Next Post