Advertisement
BREAKING
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

आ.विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत साड्या वाटप

आ.विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत साड्या वाटप
पनवेल, दि.9 (वार्ताहर) आ.विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने येत्या 10 जुलै रोजी माता-भगिनींसाठी मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून सदर कार्यक्रम पनवेल नगरपरिषदेचे मा.बांधकाम सभापती व भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य सिद्धार्थ बांठीया यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
आ.विक्रांत पाटील यांचा वाढदिवस येत्या 12 जुलै रोजी असला तरी त्याच्या पूर्व संध्येला म्हणजेच 10 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता रॉयल गार्डन लॉन्स, तहसील कार्यालयाजवळ पनवेल शहर पोलीस स्टेशन शेजारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे विविध मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते जवळपास 300 च्या वर माता-भगिनींना मोफत साड्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पनवेल नगरपरिषदेचे मा.बांधकाम सभापती व भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य सिद्धार्थ बांठीया यांनी दिली आहे. तसेच त्या निमित्ताने संगीत व स्नेह भोजन आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त पनवेलकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन आ.विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ व आमदार विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.
Previous Post Next Post