Advertisement
BREAKING
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

कळंबोली–रोडपाली–कामोठे लिंक रोडला गती द्या; नगरसेविका बायजा बारगजे यांचे महापौरांना निवेदनवाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायाची मागणी; आयुक्त, आमदार व शहर अभियंत्यांनाही निवेदनाच्या प्रती



कळंबोली–रोडपाली–कामोठे लिंक रोडला गती द्या; नगरसेविका बायजा बारगजे यांचे महापौरांना निवेदन

वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायाची मागणी; आयुक्त, आमदार व शहर अभियंत्यांनाही निवेदनाच्या प्रती
पनवेल | प्रतिनिधी वेध विकासाचा 

कळंबोली, रोडपाली आणि कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रस्तावित कळंबोली–रोडपाली–कामोठे लिंक रोड तातडीने विकसित करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा लिंक रोड विकसित झाल्यास कळंबोली, रोडपाली, कामोठे तसेच मानसरोवर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होईल. सध्या या परिसरात वाहतुकीचा मोठा ताण असून, भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी भाजपा भटके विमुक्त मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बबनराव बारगजे, कळंबोली–रोडपाली–कामोठे लिंक रोड कृती समितीचे प्रमुख महेंद्र खबाले, राजेंद्र सूर्यवंशी तसेच भाजपा पदाधिकारी सौ. कमल सरगर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी लिंक रोडचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

या निवेदनाच्या प्रती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, आमदार प्रशांत ठाकूर, शहर अभियंता राजेश कर्डिले तसेच सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनाही देण्यात आल्या आहेत. या महत्त्वाच्या विकासकामावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देण्यासाठी आणि कळंबोली–रोडपाली–कामोठे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी हा लिंक रोड लवकरात लवकर साकारावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
Previous Post Next Post